व्यसन मुक्तीच्या जनजागृतीसाठी अल्कोहोलिक्स अनोनिमस — डॉ. दिनेश पाटील
लातूर – जगात दिवसेंदिवस दारूच्या व्यसनाधीनतेत वाढ होत आहे. दारूचे व्यसन हा एक मानसीक आजार आहे. याला या आजाराला बळी न पडता या दारू पीनार्यांना व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठीच्या जनजागृतीचे काम अल्कोहोलिक्स अनोनिमस करित असल्याची माहीती मानसोपचार डॉ दिनेश पाटील यांनी पञकार परीषदेत दिली.
अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणजे निनावी मद्यपी. ही पुरूष व स्रियांची एक संघटना आहे.ह्या मधील सभासद आपले व्यक्तीगत अनुभव एकमेकांना सांगतात की ज्यामुळे सर्व सभासदांचे मानसिक धैर्य वाढते. व नवजीवनाची आशा स्फूरते. अशा पध्दतीने सभासद आपले स्वतःचे तसेच एक दुसऱ्याचे प्रश्न सोडवतात आणि दारूपासून दूर राहतात. या संघटनेत सामील होण्यासाठी पक्त एकच अट आहे की दारूच्या आजारतून मुक्त होण्याची सभासदांची इच्छा असली पाहीजे. संघटनेत सहभागी होण्यासाठी कोणतीही वर्गणी आकारली जात नाही. संस्था स्वावलंबीनी तत्वाचा पुरस्कार करते. ही संस्था १८० देशातून जनजागृतिचे काम करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लातूर मध्ये जनजागृतीसाठी आज कार्यशाळा घेतली जात आहे.
प्रथमपोस्ट लिंक्स
युट्युब —-https://www.youtube.com/channel/UCRZW…
ट्विटर —-https://twitter.com/prathampost4
फेसबुक पेज —https://www.facebook.com/prathampost12/
वेबसाईट —- http://prathampost.in/index